अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाच वर्षाव
आपल्या फिटनेस आणि स्टाईलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे चेतना पांडे.
चेतना पांडे पुन्हा एकदा तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या चेतनाने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमधील तिचा 'डेनिम आणि व्हाईट' लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
या फोटोशूटमध्ये चेतनाने मोकळे केस सोडले असून सोफ्यावर वेगवेगळ्या पोझ दिल्यात.
चेतनाने पांढऱ्या रंगाचा बकल क्रॉप टॉप परिधान केला आहे. यामध्ये चेतना अत्यंत हॉट दिसत आहे.
या बोल्ड क्रॉप टॉपला चेतनाने डिस्ट्रेस्ड लाईट-वॉश डेनिम जीन्ससोबत परिधान केले आहे.
सैल असलेली ही जीन्स तिच्या लूकला एक कॅज्युअल पण स्टायलिश टच देत आहे.