बॉलिवूडचा सर्वात महागडा घटस्फोट, ३८० कोटी दिली पोटगी

१४ वर्षाच्या लग्नानंतर झाले वेगळे!

आज आपण बॉलिवूडच्या एका सर्वात महागड्या घटस्फोटाबाबत जाणून घेऊयात.

बॉलिवूडमधील ही जोडी म्हणजे अभिनेता हृतिक रोशन आणि सुझैन खान.

हृतिक आणि सुझैन यांनी २००० मध्ये लग्न केलं होतं. १४ वर्षांच्या लग्नानंतर त्यांनी  २०१४ मध्ये घटस्फोट घेतला

हृतिक रोशन आणि सुझैन खानचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट होता. 

मिडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनशी घटस्फोट घेतल्यानंतर सुझैनला ३८० कोटी रुपयांचा पोटगी मिळाली.

घटस्फोटानंतरही ते जवळचे मित्र आहेत. त्यांच्या घटस्फोटाचे नेमके कारण कधी समोर आले नाही.

हृतिक आणि सुझैन हे दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

हृतिक सध्या सबा आझाद हिला डेट करतोय. दोघे लग्न करणार असल्याचंही बोललं जातं. 

Click Here