मनोरंजनविश्वातील प्रत्येकाच्याच संघर्षाची वेगवेगळी कहाणी आहे.
कोणी प्रचंड मेहनत करून इथपर्यंत पोहोचलंय तर कोणी करिअरसाठी घरदारही सोडलंय.अशाच एका अभिनेत्रीची ही कहाणी आहे.
अभिनेता सलमान खानने बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्रींना लॉन्च केलं. त्यापैकी एक नाव म्हणजे जरीन खान.
अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या जरीनचा इंडस्ट्रीतील प्रवास सोपा नव्हता.१२ वीत असताना तिचे वडील संपूर्ण कुटुंबाला सोडून गेले.
आर्थिक अडचणींमुळे तिने आपले शिक्षण सोडून कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
खरंतर, त्यावेळी जरीनला एअरलाईन्समध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र जरीनचं वजन तेव्हा जवळपास १०० किलो होतं त्यामुळे ती रिजेक्ट व्हायची.
२००५ साली ती युवराज सिनेमाच्या सेटजवळ पोहोचली. याच ठिकाणी सलमान खानने तिला पाहिलं. नंतर तिला 'वीर' सिनेमासाठी साईन करण्यात आलं. या सिनेमातून जरीनला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
यानंतर जरीनने 'हेट स्टोरी 4', 'अक्सर 2', '1921', 'वजह तुम हो' सह अनेक सिनेमांमध्ये काम केलं. सध्या ती पंजाबी सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे.