बॉलिवूडमध्ये अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला वेगळा असा ठसा उमटवला.
यामी गौतम हे या यादीतील एक नाव आहे.
तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच एकामागून एक अनेक हिट चित्रपट दिले.
यामी आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
कन्नड, पंजाबी आणि तेलुगु चित्रपटानंतर हिंदीकडे वळलेल्या अभिनेत्री यामी गौतमने आज हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
परंतु, तुम्हाला माहितीये का? यामीने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती.
त्यानंतर ती अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही झळकली. २०१२ मध्ये आलेल्या विकी डोनर या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
सध्या ही अभिनेत्री हक चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.