तृप्ती डिमरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
२०१८ साली आलेल्या 'लैला मजनू' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
मात्र, २०२३ साली आलेल्या 'अॅनिमल' या सिनेमाने खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळवून दिली.
सध्याच्या घडीला ती इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
तृप्ती लवकरच 'ओ रोमियो' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अशातच नुकतंच या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये तृप्तीने हटके पोझ देत हे सुंदर फोटोशूट केलंय.
या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसते आहे.