पूजाने तबूसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री तबूचा नुकताच वाढदिवस झाला. तबू ५४ वर्षांची झाली आहे.
तबूला मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने खास पोस्ट लिहित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या फोटोंमध्ये तबू पूजासोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.
दोघींनीही साडी नेसून छान लूक केल्याचं दिसत आहे. एका इव्हेंटमधील हे फोटो आहेत.
"हॅपी बर्थडे beautiful soul", असं कॅप्शन पूजाने या फोटोंना दिलं आहे.
एक सेल्फी मागितला तेव्हा तबूने असे पोझ देऊन फोटो काढले, असंही पूजाने म्हटलं आहे.