मुंबईच्या 'या' कॉलेजमध्ये शिकलीये सोनाली बेंद्रे!

हिंदी चित्रपटसृष्टीतील आपली कारकिर्द गाजवणारं मराठमोळं नाव म्हणजे अभिनेत्री सोनाली बेंद्रे.

हिंदी चित्रपटसृष्टीत ९० च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी आपला साधेपणा, सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर लाखो करोडो सिनेरसिकांना वेड लावले होते. 

'आग' चित्रपटातून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर सोनाली बेंद्रेनं बॉलिवूडमध्ये ‘सरफरोश’, ‘जख्म’, ‘हम साथ साथ हैं’ आणि ‘डुप्लीकेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

सोनाली बेंद्रेने ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर’चे ५ व्या सीझनची परिक्षक म्हणून पण काम पाहिलं आहे.

सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी मुंबईतील एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. 

सोनालीचे सुरुवातीचे शिक्षण बंगळुरू येथील ‘केंद्रीय विद्यालय’ येथे झाले, नंतर तिने मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयातून शिक्षण घेतले.

सोनालीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. सोनालीने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तिने तेलुगू, तमिळ आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

सोनाली बेद्रेंने गोल्डी बहल यांच्यासोबत लग्न केलं आहे आणि तिला एक मुलगा देखील आहे.

प्रभुदेवाच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही अभिनेत्री, प्रेमासाठी धर्मही बदलला, पण...

Click Here