अभिनेत्री सोनाली बेंद्रेने बॉलिवूडचा एक काळ गाजवला.
अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
सोनाली बेंद्रे केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे, तर तिच्या फॅशन सेन्सने सुद्धा चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
अलिकडच्या काळात सोनाली बेंद्रे देखील सोशल मीडियावर सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
त्याद्वारे तिचे फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतंच सोनालीने काळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केलंय. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
या साडीतील लूकवर तिने साजेसे झुमके परिधान केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसते आहे.