मुंबईतील 'या' कॉलेजमध्ये शिकली सोनाली बेंद्रे!


'या' कॉलेजमध्ये घेतलंय अभिनेत्रीने शिक्षण! 

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला. 

सोनालीने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी कलाविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 

सोनाली बेंद्रे तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. 

'आग' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी मुंबईतील एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. 

अभिनेत्रीने तिचं सुरुवातीचं शिक्षण बंगळुरूमधील 'केंद्रीय विद्यालय' येथे घेतलं.

त्यानंतर तिने मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. 

Click Here