अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैंकी एक आहे.
९० दशकात हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री कायम चर्चेत असते.
वयाच्या पन्नाशीतही शिल्पा तिचं सौंदर्य आणि फिटनेस टिकवून आहे.
सध्या शिल्पा शेट्टी तिचा आगामी चित्रपट 'KD The Devil' मुळे चर्चेत आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने तिने केलेल्या खास लूकची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान करुन अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे.
शिल्पाने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.