'सैयारा' फेम अभिनेत्रीचं वय माहितीये का? 



मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 

सुरांनी सजलेली ही अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. 

अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. 

अहानसह या  चित्रपटात अभिनेत्री अनीत पड्डा प्रमुख भूमिकेत झळकली आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे. 

या चित्रपटातील अनीतच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

अनीत पड्डा मुळची पंजाबची असून तिचा जन्म १४ ऑक्टोबर २००२ साली झाला आहे.

दिल्ली विद्यापीठातून तिने राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली आहे. 'सलाम वेंकी' सिनेमातून तिने करिअरची सुरुवात केली.

अभिनेत्री अनीत पड्डा २२ वर्षांची आहे. अगदी कमी वयात तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. 



देशमुखांच्या सूनबाईंचं शिक्षण किती?

Click Here