नाव बदललं अन् इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच झाली स्टार; कोण आहे ती?
बॉलिवूडच्या हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये जिची गणना केली जाते, ती अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत.
सहज सुंदर अभिनय आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर मल्लिकाने तिचा भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
मल्लिकाने करिअरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मल्लिका अनेकदा तिच्या चित्रपटांपेक्षा आयटम सॉंग्जमुळे जास्त चर्चेत राहिली.
२००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून मल्लिकाला पहिल्यांदाच प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.
पण 'मर्डर' सिनेमाने तिला स्टार बनवले. तिच्या इंटिमेट सीन्सने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता.
मल्लिकाचं खरं नाव रीमा लांबा असं आहे. हरियाणाच्या एका छोट्या गावात तिचा जन्म झाला. मुकेश कुमार लांबा असं तिच्या वडिलांचं नाव आहे तर संतोष शेरावत आईचं नाव आहे.
मल्लिकाने एका मुलाखतीत सांगितले होतं की तिला करिअरसाठी वडिलांनी नाही तर आईने कायम पाठिंबा दिला. म्हणूनच मी आईचं आडनाव लावते.
वय फक्त २१! भल्याभल्या नायिकांना देतेय टक्कर, ओळखलं?