बॉलिवूडची बेबो करीना कपूर अजूनही तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते.
करीना सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतेच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये करीना कपूरचा ग्लॅमरस अंदाज दिसत असून तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
बेबोचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
करीना कपूरने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानशी लग्न करत संसार थाटला आहे.
त्यांना तैमुर आणि जेह ही दोन मुलं असून दोघेही बॉलिवूडमधले लोकप्रिय स्टारकिड्स आहेत.