जान्हवी कपूर ही हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.
सध्या ही अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट 'परमसुंदरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
'परमसुंदरी' हा सिनेमा एक सुंदर प्रेमकथेवर आधारित आहे.
येत्या २९ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
याचदरम्यान अभिनेत्रीने केलेल्या दाक्षिणात्य लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
केसात गजरा, कानात झुमके आणि सोनेरी रंगाची साडी परिधान करुन जान्हवीने साजशृंगार केला आहे.
जान्हवी कपूर या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.