जान्हवी कपूर ही हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
जान्हवी कपूरने आपल्या दमदार स्टाईल आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.
'धडक' चित्रपटातून इंडस्ट्रीत डेब्यू करणाऱ्या जान्हवीने अवघ्या काही चित्रपटांमध्ये झळकत यशाचं शिखर गाठलं.
सध्या जान्हवी तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
निळ्या रंगाचा कलरफूल लेहेंगा परिधान करून तिने हे फोटोशूट केलं आहे.
जान्हवीच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
जान्हवी या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.