जान्हवी कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका आहे.
लवकरच ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी या चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटात जान्हवीबरोबर अभिनेता वरुण धवन देखील मुख्य भूमिकेत आहे.
सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवीने केलेल्या लूकची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
फिकट गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करून तिने सुंदर फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमधील जान्हवीचा ग्लॅमरस आणि मोहक अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.
जान्हवीच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.