बॉलिवूडच्या देखण्या आणि सोज्वळ अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे फातिमा सना शेख.
फातिमा आजवर अनेक चित्रपटांमध्ये झळकली. मात्र, दंगल सिनेमाने तिला स्टारडम मिळवून दिला.
सध्या फातिमा 'गुस्ताख ईश्क'या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
'दंगल गर्ल' म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
फातिमा तिचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने साडी परिधान करून फोटोशूट केलंय आणि हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी तिने पांढरी साडी, मोकळे केस आणि हलकासा मेकअप करत लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्री या फोटोंमध्ये फारच देखणी दिसत असून तिचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.