कोण आहे ही अभिनेत्री?
'रहना है तेरे दिल मैं' या चित्रपटातून अभिनेत्री दिया मिर्झा प्रसिद्धीझोतात आली.
अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचीही नेहमी चर्चा होत असते.
दियाने २०२१ मध्ये उद्योगपती वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाची तेव्हा खूप चर्चा झाली होती.
पण, दियाच्या लग्नातील विशेष बाब ही की तिने कन्यादान आणि पाठवणी या दोन विधींना नकार दिला होता.
कन्यादान ही अशी प्रथा आहे ज्यामध्ये वडील आपल्या मुलीला दान करतात. दिया या विचाराच्या कायम विरोधात होती.
एका मुलाखतीत ती म्हणालेली,"माझे आजोबा म्हणायचे की मुली काही कोणतं सामान नाही की लग्नात दान दिलं जाईल. हा खूपच सशक्त विचार आहे.