सध्या सिनेविश्वात रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
या बहुचर्चित चित्रपटात अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत.
मात्र, या सगळ्यात २० वर्षांची नायिका सारा अर्जुन भाव खाऊन गेली आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.त्यामधील सारा अर्जुनच्या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सौंदर्यात सारा अर्जुन बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते.शिवाय नव्या सिनेमामुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे
'धुरंधर' मध्ये सारा अर्जुन रणवीर सिंहबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.
सारा अर्जुन ही २० वर्षांची आहे. २००५ मध्ये तिचा जन्म झाला. तिचे वडील राज अर्जुन हे प्रसिद्ध अभिनेते आहेत.
बालकलाकार म्हणून तिने मालिकाविश्वात पदार्पण केलं. तिने आजवर अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे.