बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' म्हणून अभिनेता हृतिक रोशनला ओळखलं जातं.
सध्या हा अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'वॉर-२' मुळे चर्चेत आला आहे. हृतिकने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तुम्हाला माहितीये का? हृतिकचं खरं आडनाव काय आहे.
हृतिकचा जन्म हा पंजाबी कुटुंबात झाला.आश्चर्य वाटेल पण,हृतिक खरं आडनाव रोशन नसून नागरथ आहे.
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक 'रोशनलाल नागरथ' हे ह्रतिक रोशनचे आजोबा. रोशनलाल यांचे सुपुत्र आणि ह्रतिकचे वडील राकेश रोशन यांनी अभिनय क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं.
त्यावेळी 'राकेश नागरथ'च्या ऐवजी त्यांनी 'राकेश रोशन' हे नाव वापरायला सुरुवात केली.
याशिवाय 'द रोशन्स' या डॉक्यु-सीरिजमध्येही त्यांच्या तीन पिढ्यांचा इतिहास दाखवला आहे.
या कुटुंबाचं आडनाव नागरथवरून रोशन कसे झाले हेदेखील या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.