जयने त्याची गर्लफ्रेंड हर्षला पाटील हिच्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत जय दुधाणेचा विवाहसोहळा पार पडला.
जयने लग्नासाठी पारंपरिक कुर्ता पायजमा परिधान केला होता. तर हर्षलाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
रिसेप्शनलाही दोघांनी खास लूक केला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
जयने मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. रिएलिटी शोमध्येही तो झळकला.
तर त्याची पत्नी हर्षला सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे.