तन्वी कोलते यंदाच्या पर्वाची विजेती ठरली.
'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. तन्वी कोलते यंदाच्या पर्वाची विजेती ठरली.
तन्वीने टॉप २मध्ये स्थान मिळवत 'बिग बॉस मराठी ६'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं.
विजेती ठरल्यानंतर तन्वीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
'बिग बॉस मराठी ६' जिंकल्यानंतर तन्वीला ट्रॉफी बक्षीस म्हणून मिळाली.
तर प्राइज मनी म्हणून तिला १५ लाख रुपये मिळाले आहेत.
याशिवाय पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांच्याकडून १० लाखांचा चेक, तुनवाल मोटर्स तर्फे एक शानदार ई-स्कूटर मिळाली आहे.