BBM6: करण सोनावणे सिक्रेट रुममध्ये? 

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर करणने स्टेटस ठेवत "पिक्चर अभी बाकी है" असं म्हटलं होतं. 

'बिग बॉस मराठी'च्या नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर डबल एविक्शनमध्ये करण सोनावणे आणि आयुष संजीवला एक्झिट घ्यावी लागली. 

पण करणने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्याने चाहते मात्र नाराज आहेत. 

चाहत्यांनी त्याला पुन्हा बिग बॉसच्या घरात पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर करणने स्टेटस ठेवत "पिक्चर अभी बाकी है" असं म्हटलं होतं. 

त्यामुळे करण सीक्रेट रुममध्ये आहे का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. 

पण, याबाबत अद्याप बिग बॉसकडून कोणतीही हिंट देण्यात आलेली नाही. 

Click Here