'बिग बॉस मराठी ६'च्या पर्वात अभिनेत्री दिपाली सय्यद सहभागी झाल्या आहेत.
दिपाली अभिनेत्री असण्यासोबतच राजकारणातही सक्रिय आहेत.
अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला.
दिपाली सय्यद या बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासूनच आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
अतिशय सुंदर दिसणाऱ्या आणि सौंदर्याने भुरळ घालणाऱ्या दिपाली सय्यद यांचं वय किती हे माहितीये का?
दिपाली सय्यद या ४७ वर्षांच्या आहेत. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असूनही आजही त्या तितक्याच सुंदर दिसतात.