'बिग बॉस'च्या १९ व्या पर्वाचा आजपासून श्रीगणेशा झाला आहे. नेहमीप्रमाणेच या पर्वातही अनेक लोकप्रिय आणि वादग्रस्त चेहरे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.
यंदाच्या सीझनमध्ये छोट्या पडद्यावरील कलाकारांसोबतच बॉलिवूडमधील काही कलाकारांनी घरात एन्ट्री घेतली आहे.
या पर्वातील सर्वात लक्षवेधी एन्ट्री आहे ती म्हणजे अभिनेत्री कुनिका सदानंद यांची. कुनिका सदानंद यांनी एकेकाळी सलमान खानसह अनेक सिनेमांमध्ये काम केलेलं आहे.
गँग्ज ऑफ वासेपूर' फेम जीशान कादरी 'बिग बॉस १९'मध्ये दाखल झाला आहे.
Bigg Boss १९ मध्ये लोकप्रिय गायक अमाल मलिकची एन्ट्री झालेली आहे. त्याने "ओह खुदा", "मैं रहूँ या ना रहूँ" अशी लोकप्रिय गाणी गायली आहेत.
मॉडेल आणि अभिनेत्री फरहाना भट्टने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. ती काश्मीरची रहिवासी असून, तिने 'लैला मजनू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
Bigg Boss १९ मध्ये विदेशी अभिनेत्री अभिनेत्री नतालिया जानोस्झेकनं एन्ट्री घेतली. ती 'वॉर २' आणि 'हाऊसफुल ५' मध्ये झळकलेली आहे.
अभिनेता अभिषेक बजाजने 'स्टुडंट ऑफ द इयर २' आणि 'चंदीगड करे आशिकी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो 'बिग बॉस'च्या घरात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.