'जो जीता वही सिकंदर' हा ९०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. आजही लोकांना या चित्रपटाची कथा आवडते.
या सिनेमात आमिर खानसोबत आयेशा झुल्का झळकली होती. आमिर आणि आयेशाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
आज आयेशा झुल्का तिचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिला अनेक कलाकारांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.
'जो जीता वही सिकंदर'नंतर आयेशानं अनेक हिट चित्रपट दिले. पण, २००३ मध्ये समीर वाशी यांच्याशी लग्न केल्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली.
काही वर्षांनंतर आयेशा पुन्हा अभिनयात दिसू लागली. २०१८ मध्ये आयेशा 'जिनियस' या चित्रपटात झळकली. यानंतर तिने वेब सिरीजच्या माध्यमातूनही आपली ओळख निर्माण केली.
'हुश हुश' (२०२२) आणि 'हॅपी फॅमिली' (२०२३) या मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचं कौतुक झालं.
सध्या आयेशा चित्रपटसृष्टीत मर्यादित काम करत असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आजही आयेशा तेवढीच सुंदर दिसते.
इन्स्टाग्रामवरून ती चाहत्यांशी संवाद साधते. फोटो, ट्रॅव्हल पोस्ट्स आणि खासगी जीवनातील झलक ती शेअर करते.