दिलखेचक अदांवर चाहते घायाळ
अभिनेत्री अवनीत कौर आपल्या बोल्ड फॅशन चॉईसमुळे नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच अवनीतने तिच्या व्हेकेशनमधील काही हॉट फोटो शेअर केलेत.
या फोटोंमध्ये अवनीतचा जांभळ्या रंगाच्या बिकिनीतील लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अवनीत समुद्रकिनारी बिकिनी परिधान करून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
अवनीतच्या या अदा पाहून तिचे चाहते घायाळ झाले असून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स'मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अवनीतने आज बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
अवनीत कौर ही सर्वात तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे आणि ती लहानपणापासूनच काम करत आहे.
अवनीत कौर ही एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे.