लहान वयातच अभिनयाला सुरूवात, आता घराघरात लोकप्रिय
बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला कोरिया आणि भारत यांच्यातील नाते घट्ट करण्यासाठी एक प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला.
अवघ्या २२ वर्षांची असूनही त्या अभिनेत्रीने हा बहुमान मिळवला. त्या अभिनेत्रीचे नाव म्हणजे अभिनेत्री म्हणजे अनुष्का सेन.
ऑनररी एम्बेसिडर ऑफ कोरियन टूरिजमच्या रुपात सांस्कृतिक अंतर कमी करण्यासाठी तिने मोलाची भूमिका पार पाडली.
तिच्या याच महत्त्वपूर्ण कामाची पावती म्हणून चक्क कोरियन सरकारने तिला पुरस्कार देत ग्लोबल ओळखही दिली.
के ड्रामामध्ये काम करणं माझं स्वप्न होतं. कोरिया टूरिज्मने माझ्या कामाची दखल घेतल्याचा आनंद असल्याचे अनुष्का म्हणाली.
अनुष्का ही बालकलाकार असल्यापासून काम करतेय. बालवीर, देवों के देव महादेव या मालिकांतून ती घराघरात पोहोचली.
आता ती अभिनेत्री आणि लोकप्रिय मॉडेलदेखील आहे. तसेच काही जागतिक किर्तीच्या फॅशन ब्रँड्सचा चेहराही आहे.