अभिनेत्रीचं खरं नाव वाचून वाटेल आश्चर्य!
अंकिता लोखंडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अंकिता आता मोठ्या पडद्यावरही आपली छाप पाडते आहे.
आज ती अंकिता म्हणून ओळखली जाते, तिचं मूळ नाव वेगळंच होतं.
इंदौरमध्ये एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या अंकितानं अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता.
अंकिताचं खरं नाव तनूजा होतं.
अंकिता हे तिचे टोपण नाव होते आणि तिच्या जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक तिला अंकिता नावाने हक्क मारायचे.
त्यावरून अंकिताने ठरवलं की तिला तिच्या टोपण नावाने इंडस्ट्रीमध्ये ओळखलं जाईल. त्यानंतर तिने तनूजाचे अंकिता केले.
तेव्हापासून तिचे नाव अंकिता लोखंडे पडलं ते आजतागायत तिचे नाव अंकिता लोखंडेच आहे.