मराठी सिनेसृष्टीतील चंद्रमुखी म्हणजेच अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे.
अमृता आज तिचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. पती आणि सासरच्या मंडळींसोबत तिने वाढदिवस सेलिब्रेट केला.
अमृताचा पतीही अभिनेता आहे. त्याचं नाव हिमांशू मल्होत्रा असं आहे.
हिमांशू हा हिंदी सिनेसृष्टीचा भाग आहे. त्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अमृता आणि हिमांशूने २०१५ साली लग्न केलं. त्यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत.
हिमांशू अमृताला लाडाने 'अमू' अशी हाक मारतो.