मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात.
त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि चमकदार त्वचेचे रहस्य नेमके काय, असा प्रश्न अनेकांना पडतो.
नुकतंच अमृता फडणवीस यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या सौंदर्याचे गुपित उघड केले आहे.
अमृता फडणवीस यांनी कबूल केले की, चेहऱ्यावर अधिक चांगला ग्लोइंग इफेक्ट मिळावा यासाठी त्यांनी काही फेशियल थेरपी घेतल्या आहेत.
विशेष म्हणजे, या थेरपी त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून नव्हे, तर स्वतःच्या निर्णयाने केल्या आहेत.
"या सर्व फेशियल थेरपीचा मला सकारात्मक परिणाम मिळाला असून, त्यामुळे माझ्या त्वचेत लक्षणीय बदल जाणवला आहे" असे त्यांनी नमूद केले.
अमृता आपल्या दैनंदिन जीवनात 'फिक्स फूड रूटीन'चे शिस्तबद्ध पद्धतीने पालन करतात. योग्य आहारामुळेच त्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
सौंदर्यासोबतच मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे, हे सांगताना त्यांनी एक मिश्कील सल्लाही दिला. मानसिक शांततेसाठी त्या "टेन्शन लेने का नही, देने का" हा मंत्र फॉलो करतात, असे त्यांनी हसत हसत सांगितले.