बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात.
ते आता ना धूम्रपान करतात, ना दारू पितात. मात्र, एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन एका दिवसाला २०० सिगारेट ओढायचे. याबाबत त्यांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
अमिताभ बच्चन मुलाखतीदरम्यान म्हणाले की, 'मी धूम्रपान करत नाही, मद्यपान करत नाही आणि मांस खात नाही. हे कोणत्याही धर्मामुळे नाही तर चवीमुळे आहे".
ते म्हणालेले, "मी पूर्वी मांस खायचो. मी सुद्धा मद्यपान आणि धुम्रपान करायचो, पण आता मी सर्वकाही सोडून दिलं आहे".
अमिताभ म्हणाले की, "कोलकात्यात मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी २०० सिगारेट ओढायचो. पण मुंबईत आल्यानंतर मी ते सोडलं".
त्यांनी सांगितलं की, "काही वर्षांपूर्वी मी ठरवलं की, मला या सर्व गोष्टींची आता काही गरज नाही".
अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास ते शेवटचे 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात झळकले होते.
चाहत्यांना अमिताभ यांच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.