क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...!

आलिया भटच्या सौंदर्याने सारेच मंत्रमुग्ध झाले

बॉलिवूडची 'क्यूटेस्ट' अभिनेत्री आलिया भट नेहमीच तिच्या सौंदर्याने आणि अप्रतिम फॅशन सेन्सने चाहत्यांना मोहित करत असते.

अलिकडेच मुंबईतील दुर्गा पूजा पंडालमध्ये आलियाचा एक खास आणि आकर्षक देसी लूक पाहायला मिळाला.

या साध्या पण क्लासी लूकमध्ये आलिया फारच सुंदर दिसत होती. तिच्या सौंदर्याने सारेच मंत्रमुग्ध झाले. 

दुर्गा पूजेच्या निमित्ताने आलियाने ऑलिव्ह ग्रीन रंगाची साडी नेसली होती. 

या साडीला मॅच करण्यासाठी पांढऱ्या रंगाचा फुल-स्लीव्ह डीप नेक ब्लाउज घातला होता.

मेकअप कमीत कमी ठेवून, कपाळावर छोटीशी बिंदी लावल्याने तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली. 

मिनिमल मेकअपमध्ये तिने फाऊंडेशन, मस्कारा, कन्सीलर आणि लिपस्टिकचा वापर केला आहे.

तिची फिगर या साडी आणि ब्लाऊजमध्ये परफेक्ट फ्लाँट होताना दिसली.

Click Here