आलिया भटचं नवं फोटोशूट पाहिलं का?
बॉलिवूडची 'फॅशन आयकॉन' आलिया भट पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात आलियाने परिधान केलेल्या आयव्हरी रंगाच्या लेहेंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रसिद्ध फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने तिच्या सोशल मीडियावर आलियाचे हे मोहक फोटो शेअर केले आहेत.
आलिया आयव्हरी रंगाच्या लेहेंग्यात प्रचंड सुंदर दिसत होती.
तिनं परिधान केलेल्या ब्लाउजवर भरतकाम केलेली नाजूक फुलांची नक्षी होती.
या लेहेंग्यावर चक्क विमानं आणि पॅराशूट्सचे भरतकाम करण्यात आलं होतं.
मोकळे केस आणि नैसर्गिक मेकअपमुळे तिचा हा लूक अधिकच खुलून दिसत होता.
घायाळ करणारी सुंदरता, तिचं गोड हसू चाहत्यांच्या मनावर घाव करतेय.