मलायकाच्या दिलकश अदा! साडीची किंमत वाचून थक्क व्हाल

किंमत एक दोन लाख नव्हे तर तब्बल....

 अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेस आणि फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. 

वेस्टर्न आउटफिट्स असोत वा पारंपारिक वेशभूषा, मलायका प्रत्येक लुकमध्ये प्रेक्षकांना भुरळ घालते. 

नुकतेच तिने साडीत एक नवीन फोटोशूट केले असून, तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये मलायकाने अतिशय सुंदर अशी डिझायनर साडी परिधान केली आहे. 

या साडीमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

या सुंदर डिझायनर साडीची किंमत सुमारे २.७९ लाख असल्याचे सांगितले जात आहे.

आपल्या अदांनी मलायकाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही ती कोणत्याही तरुण अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते.

मलायकाच्या या साडीतील फोटोंवर काही तासांतच लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत.

Click Here