सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लाडकी अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर.
होळीच्या निमित्ताने अक्षयाने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
पांढऱ्या शुभ्र कुर्त्यावर उडालेले रंग हे अक्षयाचं सौंदर्य अधिकच खुलवत आहेत.
"रंगों में लिपटी खुशी" असं अतिशय क्युट कॅप्शनही तिनं या फोटोंना दिलं आहे.
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'लक्ष्मी निवास' या मालिकेतील आपल्या सहकलाकारांबरोबर तिनं चाहत्यांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
'लक्ष्मी निवास' मालिकेत अक्षय ही भावना हे पात्र साकारत आहे.