आकांक्षा चमोलाचं ग्लॅमरस फोटोशूट
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आकांक्षा चमोला सध्या चर्चेत आहे.
नुकतंच ती पती गौरव खन्नासोबत 'बिग बॉस १९' च्या दुबईमधील सक्सेस पार्टीसाठी पोहोचली होती.
आकांक्षाने दुबईतील या लक्झरी यॉट पार्टीदरम्यानचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आकांक्षाने या यॉट पार्टीसाठी गडद केशरी रंगाचा आकर्षक गाऊन परिधान केला होता.
तिचा हा लूक अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.
आकांक्षाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनयासोबतच आकांक्षा तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.
आकांक्षाने २०१५ मध्ये 'स्वरागिनी' या टीव्ही मालिकेने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. या शोमध्ये तिने 'परिणीता'ची भूमिका साकारली होती.