कोण आहे 'ही' अभिनेत्री?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या कार्यक्रमामुळे प्रियदर्शिनी इंदलकर हे नाव घराघरात पोहोचलं.
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने मराठी सिनेविश्वात स्वत:च एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
चौकटी बाहेरच्या भूमिका साकारत तिने इंडस्ट्रीत हळूहळू जम बसवला.
चित्रपट, मालिका तसेच वेब सीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे.
अगदी अल्पावधीतच तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. प्रियदर्शिनी सध्या 'दशावतार' या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे.
मुळची पुण्याची असलेली प्रियदर्शिनी इंजिनिअर असूनही तिने आपली आवड जपत अभिनयाची वाट धरली.