श्वेता तिवारी हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये ती दिसली.
श्वेता सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत असते.
नुकतंच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. लाल रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये श्वेताने हे फोटोशूट केलं आहे.
हाय हिल्स, केस मोकळे सोडत श्वेताने ग्लॅमरस लूक केल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे.
श्वेताचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. ४५व्या वर्षींही ती इतकी फिट कशी असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
श्वेताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.