मराठी अभिनेत्रीचा होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो
नवीन वर्षाच्या दिल्या शुभेच्छा
कवी संदीप खरे यांची लेक रुमानी खरेने बॉयफ्रेंड स्तवन शिंदेसोबत साखरपुडा केला
नवीन वर्षाचं स्वागत करताना तिने हे फोटो शेअर केलेत
स्तवनच्या मिठीत ती विसावलेली आहे. या फोटोवर चाहतेही भाळले आहेत
मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद रुमानीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय
रुमानी या नवीन वर्षात स्तवनसोबत कधी लग्न करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहेॉ
रुमानीने 'तू तेव्हा तशी' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर रुमानी दुर्गा मालिकेत झळकली, सध्या ती 'लागली पैज' नाटकात काम करत आहे.
तर स्तवन शिंदे स्टार प्रवाहच्या 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेत झळकला होता. 'जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतही त्यानं काम केलं होतं.