मिथिला पालकर हे मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे.
आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला.
वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिका तसेच वेब विश्वात तिने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्या मिथिला आपल्या कामातून ब्रेक घेत ऑस्ट्रेलियात सुट्ट्यांचा आनंद लूटते आहे.
नुकतेच मिथिलाने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ऑस्ट्रेलिया भ्रमंतीचे खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि काळी ट्रॅक पॅन्ट परिधान केली आहे.
या फोटोंमधून मिथिलाचा सहज आणि आकर्षक फॅशन अंदाज दिसून येतो आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.