गणेशोत्सव आणि भारतीय परंपरेचा साज हे एक अतूट नाते आहे. गृहिणींपासून ते अभिनेत्रींपर्यंत साऱ्यांनाच या साजाची भुरळ पडते.
'जाने तू... या जाने ना' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मंजरी फडणीस ही सध्या पारंपरिक वेशभूषेमुळे चर्चेत आली आहे.
मंजरी फडणीस ही मूळ मराठी अभिनेत्री आहे. पण ती सुरुवातीपासूनच फारशी मराठी सिनेमांमध्ये पाहायला मिळाली नाही.
मंजरीने बॉलिवूडच्या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ, तेलुगू आणि काही मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची झलक दाखवली.
हल्ली मात्र मंजरी सिनेमात जास्त सक्रीय नाही. पण सोशल मीडियावर सक्रीय राहत ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकताच तिने खास पारंपरिक लूक मधला फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये तिची नऊवारी अन् नथ उठून दिसतेय.
गडद गुलाबी नऊवारी साडी, बॅकलेस डिजायनर ब्लॉऊज, मोत्याची नथ असा मराठमोळा साज मंजरीवर खूपच शोभतोय.