प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर हे सतत चर्चेत असणारं नाव आहे.
'वेड' चित्रपटातून अभिनेत्री जिया शंकर मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय झाली.
या चित्रपटात तिने केलेल्या कामाचं सगळ्यांनीच कौतुक केलं.
जियाने 'वेड' चित्रपटाआधी काही लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
जिया ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अभिनेत्रीचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.
नुकतेच तिने लाल रंगाच्या साडीमधील काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या साडीवर तिने खूप सुंदर असा नेकलेस परिधान केला आहे.
सोशल मीडियावर जियाच्या सौंदर्याचं कौतुक करत चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.