रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटातून अभिनेत्री जिया शंकर चांगलीच प्रसिद्धीझोतात आली.
‘वेड’ चित्रपटातील तिचं काम सर्वांनाच आवडलं. 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या पर्वातही ती सहभागी झाली होती.
जियाने फार कमी वयात मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली.
सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
काळ्या रंगाच्या स्लिव्हलेस ड्रेसमधील तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"आपकी अंधेरी रातों के लिए छोटी सी चमक...", असं कॅप्शन जियाने या फोटोंना दिलं आहे.
जिया शंकरचं हे फोटोशूट चाहत्यांना फार आवडल्याचं दिसतंय.