‘वेड’ चित्रपटातून अभिनेत्री जिया शंकर मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय झाली .
निखळ सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
'वेड' चित्रपटानंतर जिया ही 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी झाली होती.
अभिनेत्री जिया शंकर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
नुकतेच तिने साडीमधील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाची साडी परिधान करुन हटके पोझ देत तिने हे फोटोशूट केलंय.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.या फोटोंमध्ये जिया खूपच गोड दिसते आहे.