'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकर हिने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली.
नववर्षातील मकरसंक्रांतीचा पहिला सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली.
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकर हिनेदेखील लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली.
कौमुदीने काळ्या रंगाची साडी नेसून खास लूक केला होता.
तर हलव्याचे दागिने घातल्याने तिचं सौंदर्य अधिकच बहरलं होतं.
सोशल मीडियावरुन अभिनेत्रीने तिच्या मकरसंक्रांत सणाचे खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये पतीसोबत तिने रोमँटिक पोझही दिल्याचं दिसत आहे.