सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई सध्या चर्चेत आहे. नुकतंच तिनं क्रिकेटर मोहम्मद सिराजसोबत रक्षाबंधन साजरं केलं.
रक्षाबंधननिमित्त जनाईने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये जनाई सिराजला राखी बांधताना दिसली. यामुळे ती खूप चर्चेत आली आहे.
जनाई भोसले ही आशा भोसलेंचा मुलगा आनंद भोसले यांची मुलगी आहे. जनाईच्या आईचं नाव आहुजा भोसले आहे.
जनाई भोसलेनं स्वित्झर्लंडच्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शाळा इन्स्टिट्यूट ले रोझी येथून शालेय शिक्षण पूर्ण केलंय. तर २०२० मध्ये तिनं पदवी शिक्षण पुर्ण केलं.
जनाई चित्रपटांमध्येही काम करण्यास उत्सुक आहे. तिला अभिनयाचीही आवड आहे. लवकरच ती प्राइड ऑफ इंडिया - छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
या चित्रपटात जनाई राणी सईबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे.
जनाई आजीला तिची प्रेरणा मानते. तिलाही त्यांच्यासारखं गाण्याची इच्छा आहे. तिचे "कहेंदी है" आणि "सैया बिना" हे संगीत अल्बम रिलीज झाले आहेत.
जनाई भोसले सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवरच ३१९ हजार फॉलोअर्स आहेत.
जनाई यावर्षी २३ वर्षांची झाली. गेल्या जानेवारी महिन्यात तिच्या वाढदिवसाची भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती.