बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर तिच्या ग्लॅमरस लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते. मात्र, तिचा अत्यंत साधेपणाही चाहत्यांना नुकताच बघायला मिळाला.
करीना तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. तिची न्युट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर हिच्या सल्ल्यानुसार ती नेहमीच घरगुती आणि पारंपरिक भारतीय जेवणाला प्राधान्य देते.
फिट राहणे म्हणजे, स्वतःला आवडत्या गोष्टींपासून पूर्णपणे दूर करणे नाही, तर तर सर्वकाही 'मर्यादित' आणि संतुलित प्रमाणात खाणे, असे करीनाचे म्हणणे आहे.
नुकताच करीनाने तिच्या संध्याकाळच्या चहाचा एक फोटो शेअर केला. यात कोणत्याही महागड्या परदेशी स्नॅक्सऐवजी भारतीयांचे लाडके 'पारले-जी' (Parle-G) बिस्किट दिसत आहेत.
गरम-गरम चहा आणि सोबत दोन पारले-जी बिस्किट्स, अशा या फोटोने, सोशल मीडिया युजर्सच्या लहानपणाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
हा फोटो पोस्ट करताना करीनाने मजेशीर कॅप्शन दिले आहे. ती म्हणते, "संध्याकाळचा चहा आणि पारले-जी... हे काही वेगळंच आहे, आपल्याला समजत असेल मला काय म्हणायचंय!"
सर्वात शक्तिशाली असतात असे लोक...!जाणून घ्या काय सांगतात चाणक्य...?