तेजश्री प्रधानचं खास फोटोशूट
मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सर्वांची लाडकी आहे.
नुकतंच तेजश्रीनं इन्स्टग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये तेजश्री प्रचंड सुंदर दिसतेय.
ड्रेसला साजेसे मोठे झुमके घातल्यानं तिचा लूक अधिकच आकर्षक दिसत होता.
तेजश्रीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना पसंत पडले आहेत.
तेजश्रीनं हा खास लूक 'झी मराठी अवॉर्ड २०२५'साठी केला होता.
तेजश्री सध्या अभिनेता सुबोध भावेसोबत 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या मालिकेत उत्कंठावर्धक वळण आले आहे.