तुम हुस्न परी... तमन्नाचा ग्लॅमरस किलर लूक

तमन्ना भाटिया ही एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे. बॉलिवूड असो वा साऊथ इंडस्ट्री, तमन्नाचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.

तमन्ना नेहमीच आपल्या कातिल अदा, कर्व्ही फिगर आणि चाहत्यांना क्लीन बोल्ड करणारा लूक यामुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरताना दिसते.

विजय वर्माशी ब्रेकअप झाल्यानंतर काहीकाळ सोशल मीडियावर शांत असलेली तमन्ना आता पुन्हा एकदा स्वत:च्या स्टाईलमध्ये अँक्टिव्ह झालीये.

तमन्नाने पुन्हा एकदा आपल्या ग्लॅमरचा जलवा दाखवायला सुरूवात केली आहे. तिने नुकताच एक हॉट आणि सेन्सुअल फोटोशूट शेअर केलाय.

गोल्डन रंगाच्या गाऊनमध्ये तमन्ना 'लय भारी' दिसतेय. तिच्या डीपनेक गाऊनला वरच्या बाजूला बारीक नक्षीकाम करण्यात आलं आहे.

तमन्नाने परिधान केलेला डीपनेक गोल्डन गाऊन लोकप्रिय फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी तयार केलेला आहे.

तमन्नाच्या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. तसेच, अनेक सेलिब्रिटींनीही तिची स्तुती केली आहे.

धुळ्याची लेक... नंबर एक !! मृणाल ठाकूरचे खास फोटो

Click Here